STORYMIRROR

Rohit Khamkar

Abstract Others

4  

Rohit Khamkar

Abstract Others

सोबती

सोबती

1 min
451

आज ही भेटायला तो, आधी सारखाच येतो.

आई सारखी माया लावतो, बाबा सारखा रागवतो.


नेहमी सारख सकाळी लवकर येतो, म्हणून दुपार पर्यन्त उशीर करतो.

कारने एवढी देऊन सुद्धा, मलाच दोषी ठरवतो.



प्रत्येक चुकीला हसून टिंगल करून, नंतर मदत करतो.

चुकला जर स्वता कधी, तर मागचे पाढे वाचतो.



काही गोष्टी बोलण्यात आता अर्थ नाही, फक्त आठवून हसतो.

पुन्हा त्याच भूतकाळात जाऊन, त्याच गोष्टी नाचवतो.



हल्ली भेटी कमी झाल्यामुळे, एकमेका बद्दल आदर खूप वाढलाय.

लग्नाच वय झालय की काय, आम्ही वयाचा दाखला काढलाय.



आधी गोंधळात शांतता शोधायचो, आता शांतीत दंगा घालतोय.

मित्रा सोबती घालवलेला प्रत्येक दिवस, जसाच्या तसा आठवतोय.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract