STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

4  

Manisha Wandhare

Abstract

झाडाची सावली

झाडाची सावली

1 min
290

घनदाट गर्द काळी ,

गार स्पर्शाने भरलेली ,

विसावा तप्त मनाला देणारी,

आल्हाददायक झाडाची सावली...

विस्तीर्ण विस्तारलेली ,

ऊन पावसांसंगे खेळी रंगलेली,

झोत वाऱ्याचा झेलणारी ,

घायाळ तरी माया देणारी ...

आल्हाददायक झाडाची सावली...

पाठमोरी कधी बुंधा गाठणारी ,

तहानुल्या जीवाला बघा,

फांदीवर आपल्या झुलवणारी ,

या छायेत गारवा जपणारी ...

आल्हाददायक झाडाची सावली...

थकलेल्या अंगी हळुच बिलगणारी,

सुर्याला बाजूला सारणारी,

डोक्यावर हात आशिर्वादापरी ,

संत भेट उलगडणारी ,

आल्हाददायक झाडाची सावली...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract