STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

4  

Manisha Wandhare

Abstract

माफ करतील का?

माफ करतील का?

1 min
253

प्रेमात सर्व काही माफ असते ,

खरचं का हो सर्वच माफ असते ...

माफ करतील का? ,

पायदळी तुडवलेल्या भावना,

प्रेमाच्या नावावर ,

मनाची केलेली दैना ,

माफ करतील का? ...

स्वप्नांना घातलेली पैजंणे ,

छुमछुम नाद करीत ,

डोळ्यांत ओलावलेली अंजणे ,

प्रेमाखातर ओघळलीत ...

ओघळणाऱ्या अश्रुची ,

फुले वेचतांना ,

सुगंधीत श्वासांना ,

श्वासांत भरतांना ,

हरवलेली तुझ्या मिठीत ती क्षणे ,

माफ करतील का? ...

फसव्या भेटींना आठवुन,

प्रेमाचे घातलेले पांघरून,

फक्त भास होता ,

वाहून गेलेल्या भावनांना सावरीत,

व्यथांना अजूनही आवरीत,

सर्वच नसते हो माफ प्रेमात,

असे मनाशी खेळणे ,

मृगजळामागे धावणे ,

सर्वच नसते हो माफ प्रेमात ...

खरं प्रेम शाश्वत सत्य ,

प्रेमाच्या आणाभाका घेत,

करेल जर फसगत ,

पेटून उठते भावना ,

संग्राम सुरू सोबतीच्या क्षणांचा ,

हतबल करून टाकतात आठवणी ,

नको वाटते त्या साठवणी ...

माफ करतील का? ...

आता तुम्हीच सांगा ,

प्रेमात सर्व काही माफ असते ,

खरचं का हो सर्वच माफ असते ...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract