STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

4  

Manisha Wandhare

Abstract

मुक्या भावना...

मुक्या भावना...

1 min
344

मुक्या मुक्या मनाच्या मुक्या संवेदना,

मुके भाव माझे रुतल्या भावनांच्या वेदना ...

सावली तुझी होती थांबल्या यातना,

उन घेऊन आले परत जुन्या जखमांच्या यातना...

तुही मुक्यानेच मला निरोप का? दिला ,

मुक्या साथीला आपल्या नाव देई मुक प्राक्तना ...

मी याच वेशीवर राहतो उभा का? जगा ना उमगे ,

उंबरठा तुझ्यासवे गेला भोग नशिबाचा मुका सहावेना ...

निस्तेज डोळ्यांत रंग भरून बघतो क्षितीजाचे तरी,

मुके क्षितीजही वाहून जाते डोळ्यांतुनी काही बोलवेना ...

मुक्या मुक्या मनाच्या मुक्या संवेदना,

मुके भाव माझे रुतल्या भावनांच्या वेदना ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract