STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

4  

Manisha Wandhare

Abstract Romance

सोबती तु पण...

सोबती तु पण...

1 min
322

तुझा भास हवाहवासा ,

तुझी सोबत हवीहवीशी ,

क्षणाचा दुरावा नकोनकोसा ,

ही विरहाची पिळ नको नकोशी ...

सोबती असता छेडतो मला ,

तुझ्या सावल्यांचा इशारा ,

तुच मितवा माझ्या वेड्या मनाचा,

हा कसा सोबतीचा दुरावा ,

ओठ शिवले का ? असे ,

मज ठावुक नाही ,

प्रेम तुझ्यावर तरीही ,

ओठांवर येत नाही ,

अशी ही अडचण ,

सोबती तु पण ,

मनाच्या सोबत नाही ,

सांग मना तुला कसे समजाऊ ,

या प्रेमाला काय नाव देऊ ?

या प्रेमाला काय नाव देऊ ?...

एकांत माझा तुझाच ,

तु माझ्यात असा,

मी न राहीले माझे ,

माझ्यात मिसळले नाव तुझे,

कसे वेगळे करू त्याला,

मी विसरले मला ,

स्वप्नांचे धागे गुंतले असे,

कसे सोडवु सांग त्यांना ,

डोळ्यात स्थिरावले प्रतिबिंब तुझे ,

या ओठावर नाव तुझे ,

ओठ शिवले का ? असे ,

मज ठावुक नाही ,

प्रेम तुझ्यावर तरीही ,

ओठांवर येत नाही ,

अशी ही अडचण ,

सोबती तु पण ,

मनाच्या सोबत नाही ,

सांग मना तुला कसे समजाऊ ,

या प्रेमाला काय नाव देऊ ?

या प्रेमाला काय नाव देऊ ?...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract