मन
मन
मनाचा काय ठावठिकाणा?
सदैव डोकावतं भूत, भविष्यात
वर्तमानाचा पत्ताच नसतो
गुंतलं असतं विचारचक्रात
विचारचक्र सतत घोंघावत असतं
आपल्या आतं फिरत असतं
कधीतरी एखादं कवाड उघडतं
आणि पाला पाचोळा बाहेर फेकतं
आजूबाजूला मळभ दाटून येतं
अंधकाराच साम्राज्य पसरतं
वेळेचं भान मग कुठे उरतं?
हळूच कुठून तरी प्रकाश किरण उगवतात
मनाच्या गाभाऱ्यात पोहोचतात
विचार चक्र थोडं थांबलेलं असतं
थोडी असते मग तिथे शांतता
बहुतेक ती काही वेळेकरताच
नवीन विचारचक्रांच वादळ
मग नव्याने वाट पहात असतं
