STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Others

4  

Manisha Wandhare

Abstract Others

हळव्या स्वप्नांचा गुलमोहर...

हळव्या स्वप्नांचा गुलमोहर...

1 min
210

एखाद्या वळणावर हिरव्या बाहूंनी विस्तारलेला ,

नाजुक पानातुन उन डोकावतांना ,

रक्तरंजीत फुलांनी बहरून ,

डोळ्यांच्या खोल डोहात उतरलेला ,

हळव्या स्वप्नांचा गुलमोहर ...

फुलांनी बहरतांना वाऱ्याशी खेळलेला ,

सावलीला घेऊन पाठमोरा ,

घाव काळजावर झेलून ही ,

गीत प्रेमाचे गाईलेला ,

जीवंत वळणावरचा गुलमोहर ...

फुले वेचतांना त्याच्या फांद्याचा झोका घेतलेला ,

उगाच पानांना ओरबडून फेकतांना ,

नजरेत त्याच्या हुंदका दाटतांना ,

हसुन तो घोट गिळलेला ,

साहलेल्या दुःखाचा सुखद भाव गुलमोहर ...

हसतांना तोही हसत दिसलेला ,

लपतांना खोड्या काढतांना ,

उदासलेल्या मनात सुख ओततांना ,

पापण्यात भरून आलेला गुलमोहर...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract