मंगळागौर
मंगळागौर
आली गौराई माहेरी
आली पवित्र सणाला
तिला माहेरी येण्याची
ओढ असते मनाला||१||
झिम्मा फुगडी घालूनी
खेळ खेळते सुंदर
माहेराला येऊनिया
मिटविते हे अंतर||२||
येता अंगणात अशी
झाला सर्वांना आनंद
तिला भेटताच क्षणी
मनी हा परमानंद||३||
सख्या आल्या भेटायला
गाती गौराईची गाणी
असे सुंदर तयांची
किती मधुर ही वाणी||४||
गौराईच्या आगमनी
साऱ्या सखी खेळी खेळ
हात धरुनी फुगडी
खेळण्याचा बसे मेळ||५||
मंगळागौर खेळण्या
साऱ्या सखी जमती
अगदी आनंदाने पहा
झिम्मा फुगडी घालती||६||