सोबती/ मित्र/मैत्रीण
सोबती/ मित्र/मैत्रीण
अंधारातही काजव्यासारखे चमकतात सोबती.
चुकीला शिक्षा म्हणून फक्त खोटंखोटं रागावतात सोबती.
कधी कधी हात सोडतात
धडपडता यावं म्हणून,
न सांगता अडखळताना मार्ग काढत असतात ते सोबती.
स्वतः मोठे होऊनही साधेपणा जपत आपल्या जीवलगांना पूढे नेत असतात सोबती.
मनातील सल मनमोकळेपणाने सांगावी वाटते ज्यांना ती सल अगदी जशीच्या तशी स्वतःत झाकतात सोबती.
हसायला शिकवतात सोबती,
स्वच्छंदी उडायला शिकवतात सोबती,
बागडायला शिकवतात सोबती,
मनसोक्त जगायला शिकवतात सोबती.
बालपण, तरुणपण आणि त्यापुढेच्या प्रवासाला हे हक्काचे,विश्वासाचे लागतात सोबती.

