STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

3  

Pandit Warade

Inspirational

सोबत

सोबत

1 min
27.8K


येतांना रिकामा आलास, जातांना रिकामा जाणार आहेस 

विचार कर माझ्या मना सोबत काय नेणार आहेस? ।। १।।


आलास कशासाठी? कुणी तुला पाठवलंय?

कोण तुझा पाठीराखा? कधी तुला आठवलंय? 

का? कधी? कुठे? यांचा विचार कधी करणार आहेस?

विचार कर माझ्या मना सोबत काय नेणार आहेस? ।।२।।


झटपट श्रीमंतीच्या नकोस लागू नादी 

काही पडणार नाही हाती नशिबाच्या आधी 

पण नशिबाच्या भरवशावर प्रयत्न का सोडणार आहेस?

विचार कर माझ्या मना सोबत काय नेणार आहेस? ।।३।।


पखालीचा हेला जसा पाणी वाहून मेला

माझं माझं करता जन्म वाया की रं चालला

सोड लोभ, मोह, दंभ कुठवर ऊरी जपणार आहेस?

विचार कर माझ्या मना सोबत काय नेणार आहेस? ।।४।।


पशु गोठ्यात राहतील, धन भूमीत गाडून राहील

पत्नी घराच्या दारापर्यंत, सोयरे स्मशानात येतील

भले बुरे कर्म तुझे सोबत तुझी करणार आहेत

विचार कर माझ्या मना सोबत काय नेणार आहेस? ।।५।।


महत्वाकांक्षी सिकंदर जगज्जेता बनला

प्रयाणकाळी मात्र रिक्तहस्तेच गेला

फ्लॅट, फ्रिज, फियाट सर्व इथेच राहणार आहेत

विचार कर माझ्या मना सोबत काय नेणार आहेस? ।।६।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational