STORYMIRROR

bhavana bhalerao

Abstract

4  

bhavana bhalerao

Abstract

सोबत

सोबत

1 min
519

दिवसभर तापुन

थकलेल्या सुर्याला

मी घरी जा म्हणालो


तसा तो म्हणाला

अजुन माझा सोबती

आला नाही


तो आल्याशिवाय

माझ पानही हलत नाही

माझा सोबती माझा

खरा पाठीराखा असतो

मी निघाल्याशिवाय

अंधार काही पङत नसतो


तुला माहितये ,

हजारो तारे ओवाळून

टाकायला लागतात

अंधारासारखी सोबत

लाभायला


त्याचीच तर उर्जा मिळते

मला पुन्हा नव्याने

उगवायला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract