संयम
संयम
संयम असावा मनावरी
होईल वाट सुकर जीवनाची।।
सुटता संयम हानी होईल सारी
असता साथ संयमाची बाग बहरेल आनंदाची।।
संकट समयी संयम असावा मनी
अंधारात जणू प्रकाश पसरवी।।
युद्ध समयी विजयाची वाट दाखवी
शत्रूलाही मित्र बनवी संयम असे ज्याचे ध्यानी।।
शांती संयमाची जोड असे ज्याचेपाशी
दुनिया सारी तो जिंकून घेई।।
कार्य अवघे सफल होती जो संयमाने वागी
संयम आपल्याला प्रेमाची भाषा सांगी।।