संयम
संयम
संयम असता मनी
खंत का बाळगावी,
संयम हा माेठा गुण
अवश्य दखल घ्यावी..
संयमी आयुष्य
हेच शांतीचे निदर्शक,
संयम हाच माेठा
सर्व गुणांचा वाहक..
संयम प्रत्येक गोष्टींचा
निगुतीने जाेडावा,
संयमाने व्यवहार
आपला आपण खाेडावा..
संयमित असावे मन
जाेड त्याला हिमतीची,
या दाेघांच्या एकत्रीकरणाने
आपण हाेताे सव्यसाची..
