स्ञी...तूच
स्ञी...तूच
हे नारी..
तूच स्वामिनी तूच मानिनी
देई बळ दुर्बलासी
तूच मधुरांगिनी||
तूच अंगणातल्या
वृदांवनाची तुळस
तूच रांगोळीतल्या
सप्तरंगाची कमान||
दारावरल्या तोरणाचे
मांगल्यही तूच
देव्हाऱ्यातल्या पाविञ्याची
ऊधळणही तूच |
तूच घरातल्या
प्रसन्नतेची आरास
तूच ऊत्साही
स्पंदनाची मनोहारी साद||
तूच लेकरांच्या
अंतर्मनाचा विलक्षण नाद
कधीही न संपणाऱ्या
संघर्षाचा तूच एक प्रवास||
घरास घरपण देणारा
तूच एक आवाज
संस्कार अन् संस्कृती
रुजविणारा तूच प्रेरक संवाद||
तूच स्वर तूच आलाप
तूच न संपणारी एक पहाट
अशा अथांग कर्तृत्वाला
माझे शतश:नमन
अशा अथांग कर्तृत्वाला
माझे शतश:नमन||