STORYMIRROR

Mohan Somalkar

Abstract Classics Inspirational

3  

Mohan Somalkar

Abstract Classics Inspirational

संत गाडगेबाबा

संत गाडगेबाबा

1 min
214

किती पुजला देव 

तरी अजुन दिसला नाही

कुठे राहतो तो 

महामारीत करोनाच्या

धावतांनी दिसला नाही....!


मानवतेचे मंदिर बांधु चला

मानवाची सेवा करुन 

हातात घ्या विचारांची केरसुनी

मनातील मळघट स्वच्छ करुन

या भवसागरी जा तरुण.!


विचार कसला करता

कोण येईल मागे सोबत

जग उध्दाराचे असेल ध्येय मनी

मदतीची येऊ देऊ नका नौबत.!


ग्राम सफाई, शहर सफाई, करा

टाकुनी केरकचरा असाच

रोगांना आमंत्रण आपण देतो

रडत बसतो शिव्याशाप देत दिवस जातो तसाच.!


अंधश्रध्देचा, आणि अस्वच्छतेच्या कचाट्यातून समाजाला वर काढणारा एकमेव समाजसुधारक....!


संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त हार्दिक अभिनंदन..!


भुकेलेल्याला अन्न,तहानेल्याला पाणी, अशिक्षिताला शिक्षण द्या. हा मंत्र देणारे उपासक...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract