संत भगवान बाबा-गीत
संत भगवान बाबा-गीत
माझा गुरु माझी आई
नित्य काळजी आमची घेई
कधी आमच्यावर रागवे
कधी प्रेमाने आम्हाला हासवे
हात प्रेमाचा पाठीवर फिरे
मनात राग आमचा ना धरे
दया अंतरी त्यांच्या उरे
हे अनमोल जीवन खरे
माझी गुरु माऊली
जीवनी नवचैतन्य देई
त्यांच्या आदर्श सत्संगाचा
सहवास लाभे आयुष्याचा
ज्ञान देई आम्हा भरपूर
कधी केली नाही कसूर
शिकवण प्रेमळ त्यांची आम्हाला
शिस्त, संयम प्रेरणा घेण्याला
अपार संस्काराचे भांडार
शिष्य घडले त्यांच्या विचारावर
कष्ट करण्याचे दिले शिक्षण
त्यांचे अनमोल जीवन
