सण दिवाळीचा
सण दिवाळीचा
अवसेच्या काळ्या राती येते दिवाळी
आगमनासाठी तिच्या लक्ष लक्ष दीप लावती प्रातःकाळी
सर्व कुटुंबीय करू लागतात साफसफाई
देवाच्या स्वागतासाठी मनाची स्वच्छता प्रामुख्याने हवी
करुनी दिव्यांची रोषणाई उजळून निघाले आसमंत
अंधःकाररूपी नैराश्य दूर सारून सण साजरा करू आनंदात
फराळ, मिठाई यांनी भरलेल्या ताटाची देवाणघेवाण होते
फटाक्यांच्या आतिषबाजाने धरती दुमदुमून जाते
अंगणातील रंगीबेरंगी रांगोळी नक्षीदार
मांगल्याचे प्रतीक आणि सौंदर्याचा साक्षात्कार
विविध रंगाचे ढंगाचे आकाशकंदील लागतात दारी
झगमगणाऱ्या दिव्यांची शोभा न्यारी
दिवाळीनिमित्त होतात नातलगांच्या भेटीगाठी
उल्हासित मनात जमतात आठवणींच्या दाटी
रुसवे फुगवे विसरून आनंदाने सण साजरा करू या
पणतीतल्या ज्योतिप्रमाणे आपली नाती फुलवू या
