STORYMIRROR

Bharti Gadgilwar

Inspirational

3  

Bharti Gadgilwar

Inspirational

सन्मान लेखणीचा

सन्मान लेखणीचा

1 min
156

सन्मान लेखणीचा

हृदयात असावा

शब्दातुन जीवनाचा

मार्ग प्रशस्त करावा.....|१|


प्रगतीची ती द्वारे

शिक्षणातुन उघडली

मानवाच्या सुखासाठी

पूर्वजांनी यातना भोगली.....|२|


लेखणी चाले भरभर

शब्द शिल्प साकारती

मानसन्मान सर्वत्र

जगी किर्ती होत जाती.....|३|


समाजोद्धारास बळ

लेखणीच्या माध्यमातून

पोटापाण्याची सोय

होती लिखाणातून.....|४|


अंगातील कलागुणांना

वैश्विक पातळीवर नेसी

शब्दरुपी अलंकार

जीवना सुंदर करसी.....|५|


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational