रूप सुंदरी
रूप सुंदरी
रम्य पहाट समयी
तळ्याकाठी बसलेली
रुप सुंदरी दिसली
शुभ्र वसने ल्यालेली.....|१|
रुप कनक समान
मोतीनथ ती नाकात
मदिराक्षी असे नेत्र
मोतीमाळ अधरात.....|२|
हाती घागर घेऊनी
शोधी कोणास नजर
भेटीसव प्रियाच्याच
आली ना तू लवकर.....|३|
पाणी निमित्तच होते
वेध तुज बघायचे
तुझ्यासवे सख्या आज
बागेमध्ये रमायचे.....|४|
