STORYMIRROR

Bharti Gadgilwar

Others

4  

Bharti Gadgilwar

Others

वैचारिक क्रांती

वैचारिक क्रांती

1 min
444

नव्या जमान्यात

खाणपान, पेहराव,

जीवनशैलीत बदल

आधुनिक रुपात मानव.....|१|


प्रगत विचारांच्या

निव्वळ बाता करती

प्रत्यक्षात जुन्या विचारांचा

पुरस्कार करत फिरती.....|२|


स्त्रीवर अन्यायाचे

चित्र समाजात दिसती

पुत्रप्रेम कन्या भ्रुण 

गर्भातच नष्ट करती.....|३|


सुन नि मुलगी समान

दावे कित्येक करती

कृती आणि कथनीत

अंतर फार असती.....|४|


समोजोद्धारास हवी

जोड वैचारिक क्रांतीची 

तथ्याधारीत निरीक्षणातुन

प्रगती साधुया देशाची.....|५|


Rate this content
Log in