STORYMIRROR

Bharti Gadgilwar

Abstract

3  

Bharti Gadgilwar

Abstract

साथ तुझी

साथ तुझी

1 min
138

सुंदर अशा जीवनात

सख्या साथ तुझी हवी

क्षण सुखाचे वेचताना

प्रीत वेल बहरत जावी.....|१|


होता आगमन जीवनात

अंधारात गवसे प्रकाश

चैतन्याचा सुर गवसतो

आनंदास खुजे पडे आकाश.....|२|


उनसावलीच्या प्रवासात

शेवटपर्यंत कोणी नसे

आयुष्याची सांज असावी

तुजसवेत चित्र नेत्री दिसे.....|३|


सहवासात तुझ्या प्रिये

हरेक क्षण सुखावतो

संकटे कितीही आली तरी

ऊर्जा नवी देऊन जातो.....|४|


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract