STORYMIRROR

Bharti Gadgilwar

Abstract

3  

Bharti Gadgilwar

Abstract

माणुसकीची दिवाळी

माणुसकीची दिवाळी

1 min
342

आली शुभ दिपावली

सर्वांसाठी चैतन्याची

रोषणाई नि आनंद

चित्रे भरभराटीची.....|१|


कुठे तो झगमगाट

आनंदाची रेलचेल

दिनाघरी भुकेचेच

चित्र नयनी दिसेल.....|२|


उत्सवाच्या सोहळ्यात

मजुरीत अडकला

दिन मोलभावाच्याच

पोटासाठी भटकला.....|३|


हेच ते गोरगरीब

मृत्यू झाल्यानंतरही

कैक जीवांना तारती

अवयव दुजा देही.....|४|


देश विदेशात फार

मागणी अवयवांची

अपघात, भुक, तृष्णा

संख्या अधिक मृत्यूची.....|५|


गरीब नकोसा सर्वांना

अवयव चालते कसे?

ज्यामुळे प्रकाश अंगणी

तेच दृष्टीस नकोसे.....|५|


माणुसकीला जप मानवा

मदतीचा हात भाग्य उजळी

पैसा, कपडे वा गोड वचने

मिळता तीच त्यांची रे दिवाळी.....|६|


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract