STORYMIRROR

Bharti Gadgilwar

Others

4  

Bharti Gadgilwar

Others

गोडवा नात्यांचा

गोडवा नात्यांचा

1 min
521

दिवाळीचा सण आला

आनंदाची, उत्साहाची

रेलचेल दिसे नेत्रा

असे पर्वणी सुखाची.....|१|


स्वप्ने झालेत साकार

मिळे जीवनाला अर्थ 

तुझ्या विना या जगाची

कल्पनाच आहे व्यर्थ.....|२|


साडेतीन मुहूर्तात

दिन असे पाडव्याचा

क्षण तोही सुखावला

पती पत्नीच्या स्नेहाचा.....|३|


ओवाळून प्रिया तुला

धन्य जाहले जीवनी

खाचखळग्यांच्या वाटा

पार करुया मिळूनी.....|४|


गोड आपल्या नात्याला

आहे आधार मायेचा

मनातील संवेदना

जपी गोडवा नात्यांचा.....|५|


Rate this content
Log in