समुद्राच्या लाटा
समुद्राच्या लाटा
1 min
465
निळ्याशार समुद्राच्या अफाट लाटा
दाखविती मनुष्य जीवनाला वाटा!!
सर्व नद्यांना गाळासहित सामावून घेती
सगुण मनुष्य गुणदोषांसह दुजा स्विकारती!!
भरती आणि ओहोटीत दिसे आपलीच कहाणी
दुःखानंतर सुख हेच अंतिम सत्य जाणी!!
रवीला क्षितिजावर मिळता होते रंगांची उधळण
एकमेकांच्या साथीने जीवनात सुखाची पखरण!!
उफाळलेल्या लहरी क्षणभराने विसावतात
पुन्हा एकदा जोमाने आकाशाकडे झेपावतात!!
जीवनाचे सार सांगुन जातात सागराच्या लहरी
खंबीर राहण्या सांगुन जाती दुःख किती आली तरी!
