चाहूल
चाहूल
1 min
454
चाहूल लागता बाळाच्या आगमनाची
वातावरणात वृद्धी आनंद नि उत्साहाची!!१!!
जो तो आपले सल्ले देणार
अनुभवाचे बोल बोलणार !!२!!
इवल्याशा जीवाच्या कल्पनात
आकार घेई विविध रंग मनात !!३!!
वाटे कधी जोरात हसावे
तर कधी मनसोक्त रडावे !!४!!
उठती भावनांचे असंख्य फवारे
डोहाळे हिचे कोणीतरी पुरवावे !!५!!
अपेक्षापूर्ती क्षणी कौतुक वर्षाव घडला
बघता हर्षित चेहरे गाली गुलाब फुलला !!६!!
