भाऊबीज
भाऊबीज
1 min
345
कधी जाते माहेराला
व्याकुळले मन आज
भेटीसाठी आतुरले
तळमळे दिनरात.....|१|
वाट पाहते कधीची
तुझ्या रे आगमनाची
झाले वरीस बहुत
नाही भेट नजरेची |२|
भाऊबीज सण येतो
काळजाला छेद होतो
तुझ्या माझ्या त्या प्रेमाला
स्पर्श करुनिया जातो.....|३|
विसरुनी सारे क्लेश
करु नवी सुरुवात
दिन तो ओवाळण्याचा
वाट पाहते दारात |४|
नभातील चंद्रातही
प्रतिबिंब तुझे दिसे
सदा असावा सुखात
मनी भाव हाच असे.....|५|
