STORYMIRROR

Bharti Gadgilwar

Abstract

3  

Bharti Gadgilwar

Abstract

कोरोनातील कटू अनुभव

कोरोनातील कटू अनुभव

1 min
134

कोण कोठला तो विषाणू

जगभर हाहाकार पाहा मांडला

मागोमाग एक अशी त्याची रुपे

बघुनी मनुष्य कसा धास्तावला.....|१|


लहानग्या विषाणूंमुळे

झाले जनजीवन विस्कळित

क्षणाक्षणाला भितीचे सावट

देवा ! कधी होणार सुरळीत?.....|२|


कोरोनाच्या कटू आठवणी

आणतात डोळ्यात पाणी

जीव मुठीत घेऊन जगत होते

जगी सर्वत्र मनुष्य प्राणी.....|३|


कोठे सेवाभावी वृत्ती दिसे तर

लोभी, स्वार्थीपणा उच्चांक गाठी

जीवनावश्यक गोष्टींच्या तुटवड्यात

अग्रेसर दिसे छोटे मोठे पाठोपाठी.....|४|


नियतीचा खेळ कसा चालला

माणुसकीची भाषा बोलणारा

आपल्याच माणसापासून दुरावला

प्रत्येकालाच असे स्वतःचा जीव प्यारा.....|५|


आता सारे काही व्यवस्थित होताना

ओमायक्रॉन उंबरठ्यावर येऊ घातला

कधी संपेल हे दुष्टचक्र कोरोनाचे?

प्रश्न प्रत्येक मनाला भेडसावला.....|६|


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract