STORYMIRROR

काव्य चकोर

Abstract

4  

काव्य चकोर

Abstract

संकल्पाचा प्रकल्प

संकल्पाचा प्रकल्प

1 min
354

आज,आता उपरती झालीय

उद्या नकळत विस्मृतीत जाईल..

आजचा ओसंडणारा डाटा

उद्या नक्की फॉरमॅट होईल..!!


प्रत्येकाकडे असते एखादी

आपली स्वतंत्र सरकारी फाईल..

पण मनाच्या लाल फितीत

ती हळूहळू धूळ खात जाईल..!!


संकल्पाचा प्रकल्प मात्र

उद्घोषणांनी दुमदुमून जाईल..

उद्घाटनही दणक्यात होईल

पण कोनशीला वाहून जाईल..!!


तुमचंच काय हो..?

उद्या माझंही तसंच होईल..

आज एकोणीसवं सरतंय

उद्या विसावं येईल..!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract