संकल्प
संकल्प
वर्ष नवे संकल्प नवा
नव्या उमेदीचे नवे तराणे
स्वप्न नवे जोश नवा
गाऊ हर्षाचे जीवनगाणे ||१||
वेध घेण्या अवकाशाचे
बळ पंखात विश्वासाचे
करु विहंग निर्भयतेने
स्थापू विश्व आनंदाचे ||२||
देऊ तिलांजली मतभेदांना
निर्माण करु अभेद्य नाते
उजळवून टाकू दाही दिशा
ठसवू मनी निर्धाराचे पाते ||३||
जागवू ध्यास यशाचा
वाढवू भूक लढण्याची
ठेवू जागृत देशप्रेम
लावू सवय जिंकण्याची ||४||
करू हाच सत्य संकल्प
देऊ दीना हात मदतीचा
चेहऱ्यावर हसू खुलवण्याचा
अपंगास प्रेरणा देण्याचा ||५||
हरवलेला संवाद साधण्याचा
थोरामोठ्यांच्या सन्मानाचा
आई-वडील, शिक्षकांच्या आदराचा
संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा ||६||
