संघर्ष
संघर्ष
आश्वासनाच्या दुनियेत
संघर्ष हा जगण्याचा
सर्व काही अलबेल
प्रश्न हा पोटा पाण्याचा
संकटे येती अपार
जगणे नको सोडू
संघर्षाच्या जगण्यात
डाव नको मोडू
प्रयत्न कर कसून
नको राहू उदास
प्रयत्नांती परमेश्वर
हाच एक मनी ध्यास
कष्ट कर इतके की
मिळे कष्टाचे फळ
संघर्षाच्या वाटेवर
लागे मेहनतीची झळ
बदलतील हेही दिवस
हा श्वास आशावादाचा
उतरावे लागेल रस्त्यावर
हा संदेश संघर्षाचा
