स्नेहवेल
स्नेहवेल
स्नेहवेल फुले जिव्हाळ्याची,
सोन्याहून प्रिय प्रेमळ नात्यांची
नवं जुनं सारे मतभेद विसरून,
करे उधळण अबीर गुलालाची
स्नेहवेल भेट जन्मातंरीची,
मनाची स्पंदने ओढ काळजाची,
सुसंस्काराची हाक अंतरीची
बहरे नाती प्रेमळ एकरुपतेची
स्नेहवेल अमृततुल्य हृदय कुपी मेवा,
मायबापाचा अखंड झरस्त्रोत ठेवा
दिव्य ऋणानुबंध झरे अमृताचे,
शांत मृद्गंध बीज धडे सृजनाचे
स्नेहवेल वसंत बहार फुलविणारी,
संसारासह देशहितास दरवळणारी
कर्तृत्वाची ज्योत पेटवी विश्वांगणी,
सप्तरंगाची बहार फुलवीत अंगणी
