संधी शोधतो मी
संधी शोधतो मी
जीवनाच्या प्रवासात कल्पनेला गती शोधतो मी,
आयुष्याच्या संकटांमध्ये यशाची पायरी शोधतो मी.
जीवन जगण्याचा आधार सापडतो का कुणाला?
आयुष्य सुखमय करणारे नेतृत्व शोधतो मी.
दैनंदिन दिवसाचा खर्च कमी होण्याचा प्रयत्न करतो,
शिक्षणाच्या व्ययावर अंकुश लावण्याची प्रार्थना करतो.
लाईट बिलावरील आकडा कमी करण्याचे कारण बघतो मी,
आयुष्य सुखमय करणारे नेतृत्व शोधतो मी.
आवाजात आपुलकी, प्रेमाची भावना दिसते का कुण्यामध्ये,
सांतवणेचा हात देतो का कुणी आपल्या हातामध्ये.
राष्ट्रीय पातळीला समोर ठेवून कुटुंबाला साथ देणारी व्यक्ती बघतो मी,
आयुष्य सुखमय करणारे नेतृत्व शोधतो मी.
शास्त्राची संकल्पना ज्ञानात वसते ज्याच्या,
शस्त्राचे ज्ञान हातात दिसते ज्याच्या.
प्रेमाने विश्व जिंकण्याची क्षमता शोधतो मी,
आयुष्य सुखमय करणारे नेतृत्व शोधतो मी.
