STORYMIRROR

Sonam Thakur

Tragedy

3  

Sonam Thakur

Tragedy

स्मृतीगंध

स्मृतीगंध

1 min
256

वेदना होई माझ्या मना

हरवला माझा आधार

कोसळले आज छत्र माझे

आजी तुझा सुटला हात

बरी होऊन येशील घरी

खात्री होती ग मला मनी

डॉक्टर ही म्हणत होते

सुधारते आहे तुझी प्रकृती

का तरी नियती फिरली

झाली सगळीच राख

कुठे शोधू आता तुला

दे ना आजी पुन्हा तू साद

घराला अजून गरज तुझी

ये ना परतुनी तू ग आजी

सहन होत नाही तुझं जाणं

आम्हाला असं पोरकं करणं



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy