स्मृतीची चाळता पाने
स्मृतीची चाळता पाने
स्मृतीची चाळता पाने
तो क्षण आठवला
वाटले जणू काळाने
आपला रंग गोठला
आम्ही दोघेही निघालो
होतो प्रवासाला
नवीन संसाराची
साद गवसायाला
वेग होता प्रचंड
त्याच्या गाडीला
वारा अंतर कापत
होता आमच्या जोडीला
मी त्याला थांबवले
आणि रोखले ही
नको करू अतिघाई
असे टोकले ही
मात्र तो होता
त्याच्याच धुंदीत
सुखाचा क्षण, वाटला
करावा गंधित
आमची मंजिल
जवळच येत होती
पण, नियती वेगळाच
खेळ खेळत होती
नवीन जीवनाचे
स्वप्न आमुचे भंगले
वाटले आता आपले
सर्व काही संपले
ज्या क्षणी मी
उघडले डोळे
फाटले होते
आकाश निळे
कायमचा सोडून
तो गेला होता मला
मी एकटी, अपूर्ण
हा भोग सलला
स्मृतीची चाळता पाने
मनी तो शहारून गेला
आजन्माचे अपंगत्व आले
परिणीती जीवन आमचे
कसे विना मोहरून गेला
