समजलेच नाही,कसे दिस सरले
समजलेच नाही,कसे दिस सरले
सुखी होतो आम्ही, वाडवडिलां आधारे,
हिवाळे,उन्हाळे,किती,पाणकाळे!
आयुष्याचे गाणे,हे बेगाने झाले,
समजलेच नाही कसे ,दिस सरले !!धृ!!
मस्तीत होतो,तारूण्यात आम्ही,
अहोरात्र काम,धनसंचयाचे केले!
कधी विचार,ना केला,मौजमस्ती करावी,
घरादारांसाठी,सर्व त्यागून दिधले !!1!!
बघता बघता,केस पांढुरके झाले,
रंगरूप आमचे,लयाला ही गेले !
दंडातल्या,बेडक्या त्या विराल्या,
मुखी पंगती,दंत कवळीचे आले !!2!!
हळुहळु सारे,रोग एकवटले,
क्षीण झाली,शक्ती,हीन दिन जहाले !
मान,थरथरती झाली,दिसेनासे झाले,
पदोपदी,अपमान,घोट गिळणे, प्राप्त झाले !!3!!
पै पै,जमवुनी,घर उभे कले,
घरी त्याच आम्ही,कां उपरे ठरावे!
घरी रोपटे ,प्रेमभावे,जिवापाड जपले,
तयांनीच कां ,वृद्धाश्रमी,आम्हां पाठवावे!!4
कळत नाही कां,नव्या या पिढीला,
ऋण उतराई,करणे प्राप्त आहे!
समजत नाही कां,नव्या या पिढीला,
भविष्यांत तयांना,हेच भोगणे प्राप्त आहे!!5
