समदु:खी
समदु:खी
सुविचार,चांगल्या विचारांच्या पोस्ट
शेरो शायरी,कविता,म्हणी,डेली कोट्स,
आयुष्यावरचं एखादं लांबलचक पुस्तक,
आर्टिकलं,वृत्तपत्रात मोठमोठी आशय असलेली
आयुष्यावरची सदरं,आणि
एखाद्या महापुरूषाच्या जीवनावरचा
एखादा उत्तम सिनेमा.
प्रत्येकवेळी हे एवढं सगळं
आयुष्यात भरकटलेल्या
एखाद्याचा जालीम उपाय कसकाय असू शकतं.?
ज्यांना कुणाला यापैकी कुठलाच इलाज
असर करत नाही.
अशांना आयुष्यात
फक्त एक समदु:खी जरी भेटला
तरी त्याचं आयुष्य सुंदर असतं.
