खळगी असलेलं पोट
खळगी असलेलं पोट
यातनांना कोण घालत असेल
खतपाणी रोजंच
व्यथा विस्तारतात आपापलं नशिब समजून
ओठांवर कोण नेत असेल पुन्हा
पोटात उतरलेला तृप्तीचा घोट...।
आवंढा गिळलाच जातो नाईलाजाने
जेव्हा संघर्षाला मिळत जाते कुठून तरी
वाढत जाण्यासाठी मूठमाती
निसर्ग नाही तर मग कोण देत असेल माणसाला,
खळगी असलेलं पोट...।
