कवितेच्या सर्रास दंगली झाल्या
कवितेच्या सर्रास दंगली झाल्या
सलोखा म्हणून
मी ना कुठला कॅमेरा रोल केला.
ना बासरीतून सुर काढले.
नाही डफावर थाप दिली कधी.
ना कुठला माईक हातात घेतला.
निव्वळ कलमालाच कंगाल करायचं ठरवलं म्हणून
प्रबोधनात एकदा,
मी फक्त मनातला विद्रोहं
एका जातीहीन को-या कागदावर,
एका खाली एक लिहीला.
सगळ्या नैतिक अनैतिकतेचं भान ठेऊन.
आपलेच लोकं षंढ कश्याला?
खरं तर मला आगंच लावायची होती
इथल्या विद्रुप व्यवस्थेला,
धारदार कवितेच्या विद्रोही मुखाग्नीने.
पण सावधगिरी समजून राजरोसपणे
शब्दच भंगली सगळी
या ईमानी कागदावर.
आणि
कवितेच्या सर्रास दंगली झाल्या.
