आजकाल लोकं
आजकाल लोकं
आपल्या डोंगराएवढ्या दु:खाचा इतकाय भार.
या दु:खहीन को-या कागदाला की
या अपायकारक आयुष्याला लेखणीचाच उपाय फार.
म्हणून तर मग रात्रीच्या अवेळी लिखानाच्या नादात
असंख्य स्वप्न मरतात.
भूतकाळ,वर्तमान,भविष्य डोळ्यापुढे
तर निसते निसते तरंगतात.
झोपेसाठी तरसलेले डोळे इतके आसुसतात की,
रोजचं दु:खं काय लिहीणार मी पण.
मी कुठे ही गेलो तरी दु:खं सोबत येईलंच सावलीगत,
उक्तीप्रमाणे पाचवीला पुजलेलं...!
आजकाल लोकं डाॅक्टरपेक्षा
हाॅस्पिटल कर्मचाऱ्यालाच
जास्त सांगतात,
आयुष्याचं दु:खं कुजलेलं...!
