प्रेम
प्रेम
प्रेम.
करू नये पण केलेलं.
होऊ नये पण झालेलं.
ते हौशिक नसतं.
नाही कुठल्याच शर्तीत आलेलं.
जगात कुठं ही जा.
प्रेमाचं बेसिक हेच असतं.
दुनियेसाठी तं नंतर.
एकमेकांसाठी अगोदरंच
फार सोशिक असतं.
कुणी कुणावर प्रेम करावं किंवा करू नये
हे कुणीच कुणाला आता
ठामपणे सांगू शकत नाही...!
याच प्रेमापोटी आई-वडीलांनी
पाहिलेल्या स्थळाची,
आजकाल आई-वडिलांनाही
हमी असू शकत नाही...!

