STORYMIRROR

Suraj Dalvi

Romance Classics Fantasy

3  

Suraj Dalvi

Romance Classics Fantasy

माझ्यानंतर तुला माझ्या कविताच छळतात

माझ्यानंतर तुला माझ्या कविताच छळतात

1 min
176

आता जर हालहवाल विचारशील,

विचारपूस खबरबात घेशील

तर एवढंच सांगेन भल्याबु-याने

सहन होतयं तोवरंच दु:खयं

ज्या दिवशी असह्य होतं,

त्या दिवशी कविताच असते

तुला कवेत घ्यावं अन् घट्ट मिठी मारावी अगदी तशीच

नेमकी हीच भानगड नकोय आपल्या कुणालाच

ना तुझ्या गटात ना माझ्या तटात

आजकाल मी ते ही सोडलयं हतबल हताश होऊन

खरं तर तुझ्या नादाला लागलो,

आणि बरंच काही सुटलं आयुष्यात तुझ्यासहीत

पण हे अति होतयं खातिर

दु:खं पाठ सोडत नाही जसं,

तशी हाताची बोटे आपोआप वळतात

कवितेकडे

पण मी हे ही ऐकलयं

माझ्यानंतर तुला माझ्या कविताच छळतात

अलिकडे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance