इतकं मला अधू केलं
इतकं मला अधू केलं
नैतिक अनैतिक होण्याच्या वादात
तुला नि मला
धडा शिकवण्याच्या हट्टापायी
या पुरोगामी व्यवस्थेने
एक थोर काम काय केलं असेल तर
सगळ्यात पहिले
बळजबरीने तुला एका रात्रीत
सक्तीने अनोळखी दुस-या व्यक्तीची वधू केलं...!
तितक्याच जवळचा असणारा मी.
माझ्या सबंध रात्रीची झोप अशी लुटून नेली.
इतकं मला अधू केलं...!
