माझी कविताच हरवली
माझी कविताच हरवली
प्रेमाची ठराविक संकल्पना
किंवा व्याख्या
लिहीता किंवा सांगता
येत नाही कुणालाच खरं तर.
प्रेम कळायला,उमजायला लागतं
तोवरच संदर्भ बदलतात.
दरम्यान
एकदा अशीच
माझी कवितेशी
इतकी ओळख आणि जवळीक झाली की,
मी माझं आयुष्यंच कवितेत शोधू लागलो.
इतकी अशी कविता गळ्यात पडली…!
कविता आणि मी.
मी माझं आयुष्य कवितेत शोधू लागलो खरंरंरं,
पण मग पुढे माझी कविताच हरवली..!

