STORYMIRROR

प्रदीप माने

Romance

3  

प्रदीप माने

Romance

सलगी

सलगी

1 min
311

तू दिली जखम, जखम आणिक खोल झाली,

गोड वेदनांशी मग, सलगी हळूच झाली.


मनात फुलांचे ताटवे, सुगंधी तुझ्या आठवांचे,

वेड्या फुलपाखरांची, गर्दी आसपास झाली.


तुझी आठवण सोबत, जणू आयुष्यास माझ्या,

गजबजल्या गर्दीतूनही तू, माझा एकांत झाली.


ओठांवर ठेवून चांदणं, हसण्याची सवय तुझी,

शरमून चूर पापणी, जगण्याचं कारण झाली.


माझे जगायचे अजूनही, दिवस बाकीच राहिले,

तू खुणावलंस आणि, घालमेल श्वासात झाली.


थोपवून ठेवले मी, उगवत्या सूर्यास तेव्हा,

तुझ्या मिठीत जेव्हा माझी, धुंद पहाट झाली.


तू दिली जखम, जखम आणिक खोल झाली,

ओठांवरल्या शब्दांची, आपसूक गझल झाली.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance