STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Tragedy Inspirational

सलाम त्या सर्वाना

सलाम त्या सर्वाना

1 min
187

सलाम त्या संधीसाधू राज्यकर्त्यांना

सलाम लोकशाहीतल्या कागदोपत्री राजाला

सलाम त्यांच्या तुघलकी ध्येय धोरणाला 

सलाम त्या निष्पाप, निरागस मरणाला


सलाम त्या जीवाचं रान करणाऱ्या प्याद्याला

सलाम त्या जोकर ,वजीर अन त्या राजाला

सलाम त्या महागाईत होरपळणाऱ्या जीवाला

स्वार्थासाठी पापात वाटेकरी होणाऱ्या मीडियाला 


सलाम त्या बेरकीपणा अन् निर्लज्जपणाला

सलाम त्या बिनबुडाच्या गेंड्याना 

सलाम त्या रक्तपिपासू बड्या धेंडांना

सलाम त्या बाटलीतल्या गुलामांना


सलाम त्या लोकशाहीच्या आतून ठोकशाहीला

सलाम त्या पातशाहीअन दंडुकेशाहीला

सलाम त्या रंग बदलणाऱ्या सरड्याना

विनाकारण बांधल्या गेलेल्या तिरड्याना


सलाम त्या मानवतेच्या लढाईत हरलेल्याना

सलाम त्या चिरडल्या गेलेल्या आवाजाना

सलाम त्या धडा शिकवणाऱ्या प्रत्येकाला

सलाम त्या सर्वाना हारुनही जिंकलेल्याना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy