सलाम तुला
सलाम तुला
दुखतं गं मन
बघून तुझ्या त्या जखमांना
चिमुकली जरी
सहन केल्या तू होणाऱ्या वेदनांना
सलाम तुला
तू सहन केल्या टोचणाऱ्या सुया
ओठांवर हसू
लपवून भीती मनातच तुझ्या
जरी वाहलं रक्त
जरी ते कमी रडवते किती
अंगाचे दुखणं ते
चेहऱ्यावर मात्र काही न भीती
भरून आले मन
गोंडस रूप नी ते रक्त बघून
हसवलं तुला
म्हणूनच मी अधून मधून
हसू बघून हर्षलो
मोठयांपेक्षा तू ठरली मोठी
तुझ्या साहसापुढे
मोठमोठी ठरली बघ छोटी
