STORYMIRROR

Prashant Kadam

Inspirational

3  

Prashant Kadam

Inspirational

सलाम सैनिक हो !

सलाम सैनिक हो !

1 min
14K


सलाम आमचा जवानांना

त्रिवार मुजरा शूर वीरांना

मातृभूमी अन् देशासाठी

अमर होणाऱ्या त्या वीरांना !!


कर्तव्य दक्ष सदैव असती

दिवस असो की रात्र असो

तमा नसे त्यांस अन्नपाण्याची

मग थंडी असो की पाऊस असो !!


होऊन उदार जीवा वरती

प्राण पणाने लढती सारे

शत्रूंचा पूर्ण बिमोड करण्या

पेटून उठती जवान सारे !!


गृहसौख्य ही विसरूनी जाती

आक्रमण होता शत्रूचे

प्राण निछावर करती आपुले

शिरकाण करण्या शत्रूचे


परमवीर हे जवान आमचे

भूषण भारत देशाचे

आदर,अभिमान खास असे

कारण आहेत आमच्या देशाचे !!


सलाम आमचा जवानांना

त्रिवार मुजरा शूर वीरांना

मातृभूमी अन् देशासाठी

अमर होणाऱ्या त्या वीरांना !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational