सख्या सजना
सख्या सजना
प्रीतीच्या चांदराती
घेऊनि हात हाती
होशील का माझा सख्या साजणा...?
चांदण्या धुंद अंगणाती
चंद्रतेजाने ढवळते माझी कांति
शहाऱ्यात मज भिजवशील का
होशील का माझा सख्या साजणा....?
सोडवून थकले मी भावनांची गुंतागुंत
ऊर दाटला अंतरी तरी हात रिक्त
या रिक्त ओंजळीत चांदण्या भरशील का
होशील का माझा सख्या साजणा....?

