STORYMIRROR

Pradnya Khadakban

Inspirational

3  

Pradnya Khadakban

Inspirational

सखी/मैत्रीण

सखी/मैत्रीण

1 min
407

खुप दिवस झाले, 

तुला हसताना पाहुन....

खुप दिवस झाले, 

तुला प्रत्यक्ष भेटुन...

आता अडकलेस, 

तु घराच्या चार भिंतीमध्ये... 

गुंतलेस तु,

घरातल्या कामामध्ये...

तुझा थकलेला चेहरा,

तुझे ते विस्कटलेले केस... 

मला आता बघवत नाहीत....

कामाच्या या गराड्यात, 

तु स्वतःला किती बांधुन घेतलंय... 

श्वास घ्यायला सुद्धा तुला उसंत नाही... 

किती त्रास होतोय तुला,

पण तुझी तक्रार नाही.... 

थकतेस तु,

पण अविरत तुझं कार्य चालु असते...

तुझा मायेचा झरा, 

ओसंडून वाहत असतो...


अग घे थोडी, 

क्षणभर विश्रांती...

मनावरच ओझं झुगार...

झटक ती सारी मरगळ...

घे मोकळा श्वास...

अग बस जरा शांत... 

ऐक एखादं सुंदर गाणं... 

मनमुराद गाऊन घे...

बघ एखादं नृत्य...

मनमुराद नाचुन घे...

हास्याचे कल्लोळ बघ....

मनमुराद हसून घे....

थोडं जग तु स्वतःसाठी...

आयुष्यातला प्रत्येक क्षण तु वेचून घे.... 

जोपास तुझे छंद...

आयुष्य थोडं आनंदाने वेचून घे...


तु जर हसलीस तर सारं घर हसेल...

तुझ्या हसण्याने ते नवचैतन्यमय होईल...

तुलाच हा बदल खुप छान वाटेल...

परत जोमाने तुला काम करायची प्रेरणा मिळेल.. 

तुझे विस्कटलेले केस जरा तु सावर.... आरश्यात बघुन स्वतःला छान आवर... 

बघ तुला किती प्रसन्न वाटेल... 

तुझ्या प्रसन्न चेहऱ्याने परत घर आनंदुन जाईल...

परत तुझ्या घराला नवचैतन्य येईल... 


अग सखे, करशील ना तु एवढं...

बस बाकी काही सांगणं नाही...

तु आनंदात रहावी यापेक्षा दुसरा मागणं नाही... 

जगणे जगून घ्यावे...

हसणे हसुन घ्यावे...

आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने वेचून घ्यावे...

माझ्या सखीने आयुष्यभर आनंदी रहावे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational