सखी लावण्यांची खाणी
सखी लावण्यांची खाणी
सखी माझी आहे गुलमोहरासारखी
सुगंधित सुवास यौवनाचां
प्रेमाची ती गुलकंदी
सखी लावण्यांची खाणी
मनमोहिनी मनभावन
हृदयाचे सांभाळते साम्राज्य
करते घायाळ हिरणी
सखी लावण्यांची खाणी
जीव व्याकुळतो तिच्याविन
घरघर लागते घरावीन
मदनमोहिनी सुकोमल कामिनी
सखी लावण्यांची खाणी
नयनबाण काळजात घुसतो
लालबुंद गुलाब खुलतो
बहरते ती मग वेलीवाणी
सखी लावण्यांची खाणी

